Posts

Showing posts from August, 2023

कोल्हापुरात, ताराबाई रोडवर पाहुणा म्हणून आला आणि जीवाला मुकला...

२० डिसेंबर १९५२ ची थंडीतली सकाळ.... नुकताच दहा बारा वर्षांपूर्वी ताराबाई रोड बांधून खुला झाला होता. त्यामुळं अंबाबाईकडून रंकाळ्याकडं जाणारी वर्दळ आता ताराबाई रोड वरूनच वाहती असायची. सकाळची वेळ असल्याने काही पेठेतली मंडळी रंकाळ्यावर फिरायला तर कोणी अंबाबाईच्या देवळाकडे दर्शनाला निघाली होती. आणि ......अचानक बाबू जमाल दर्ग्याजवळ तो दिसला. तसा रात्रभर प्रवास करून आल्यामुळं दर्ग्याजवळ एक आडोसा धरून तो निवांत बसला होता. पण डिसेंबर च्या थंडीत पण त्याला बघून  कोल्हापूरकरांना घाम सुटला. पावलं क्षणभर थबकली, आणि डोळ्यांना जे दिसतंय त्याची खातरजमा झाल्यावर हीच पावलं घाबरून वाट दिसेल तिकडं पळायला लागली. आणि कोल्हापुरात एकच गलका उडाला... "अंबाबाईच्या देवळाजवळ व्हाग आलाय व्हाग. बाबू जमालच्या दर्ग्याबशी हाय आत्ता." पण प्रत्यक्षात रस्त्यावर ढाण्या व्हाग बघायचं कोल्हापूर करांच्या नशिबात त्यादिवशी तरी नव्हतं. कारण तो वाघ नव्हता. तो होता बिबट्या किंवा आपल्या भाषेतला बिबळ्या...पूर्ण वाढलेला शेपटीसकट सहा फूट आणि उंचीला तीन फूट..लोकांच्या गलक्यानं बावरून हे वाघरु तसंच नव्या बुधवारात घुसलं. धीर चेपल...

अशीच एक प्रथा, ग्रॅहॅमच्याच शब्दांत !!!

 कोल्हापूर पहिल्यांदा कागदावर लिखित रुपात मांडलं गेलं ते करवीर महात्म्यात. पण त्यात कोल्हापूरचं फक्त अध्यात्मिक स्वरूप आणि ते ही भौगोलिक जोड देऊन रंगवलय. पण खऱ्या अर्थाने कोल्हापूर उभं आडवं कागदावर उभं करायचं श्रेय जातयं ते मेजर डग्लस सी. ग्रॅहॅम यालाच. कोल्हापूरवर इंग्रजी सत्ता आल्यावर ती राबवणारा हा पहिला अधिकारी. कोल्हापूरचं स्वतःचं चलन रद्द करून ईस्ट इंडिया कंपनीचा रुपया चलनात आणणाराही हाच मेजर ग्रॅहॅम. त्याने लिहिलेला ग्रॅहॅम रिपोर्ट म्हणजे १८५४ सालच्या कोल्हापूरचां आरसाच आहे. पुढच्या काळात येणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांना कोल्हापूर समजावं यासाठी ग्रॅहॅमने हा रिपोर्ट लिहिला.  या रिपोर्टचा आवाका बघता त्याला ग्रंथराज म्हणणे जास्त योग्य ठरेल. या रिपोर्ट मध्ये काय आहे हे शोधण्यापेक्षा काय नाही हे शोधणे आजही अवघड आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडन मधील डायरेक्टर बोर्डाच्या आदेशानुसार ब्रिटिश अखत्यारीतील मुलुखाची सर्वांगीण माहिती संख्याशास्त्राच्या आधारे गोळा करायचं काम कोल्हापूरसाठी ग्रॅहॅमने पार पाडलं. १८४६ ते १८५४ या आठ नऊ वर्षात कोल्हापुरातली जमीन, हवामान, पाणी, तळी, बंधारे, लोकस...

कृतिसमिती

२२ मार्च १८८५ ची संध्याकाळ. रविवारचा दिवस होता. शुक्रवार नसतानाही अंबाबाईच्या देवळात तुडुंब गर्दी जमली होती. कसलीशी सभा भरणार असं दिसत होतं. बघता बघता गावातले प्रतिष्ठित, उच्चभ्रू, मध्यम वर्गीय ते हातावर पोट असणारे असे साऱ्या थरातले लोक रामाच्या पाराजवळ जमले. लोकांची कुजबुज आणि बऱ्याच जणांचा कपड्याचा अवतार यावरून अगदी आयत्यावेळी अचानक सभा बोलावली होती असं दिसत होतं. जमदग्नी सावकारांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली... विषय होता पाण्याचा आणि निमित्त होतं, दक्षिणवृत्त नावाच्या वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीचा.. " कोल्हापूर नगरपालिका पाण्यावर कर बसवणार ". रानडे वकिलांनी सभा सुरू केली. विषय असा होता. आठ दहा वर्षांपूर्वी कात्यायनीच्या डोंगरातून कमानी घालून त्यावर पाट बांधून कोल्हापुर पाणी पुरवठा योजना सरकारने कार्यान्वित केली होती. (सध्याचा पाण्याचा खजिना). काही काळातच त्यात काही त्रुटी आढळल्याने कळंबा तलाव खोदून ही योजना सुधारली होती आणि पाण्याचा अखंड पुरवठा सुरू झाला होता. हा तलाव खोदण्यासाठी सरकारला बऱ्यापैकी खर्च आला होता. (सरकार म्हणजे कोल्हापूर दरबाराच्या वतीने कामकाज बघ...

Bridge To India....

Image
  Bridge to India  जाड अशा लोखंडी तारांनी तोललेला जगातला पहिला पुल इटलीत अर्नो नदीवर बनवला गेला, १९७८ साली. आता हा पुल नक्की कसा असतो ? यासाठी मुंबईतला बांद्रा वरळी सी लिंक ब्रीज डोळ्यासमोर आणला तरी पुरेसं आहे. या अशा पहिल्या पुलाचा आणि कोल्हापूरचां संबंध आहे. अगदी दुरून असला तरी आहे. मुळात या इटलीतील पुलाचा इटालियन भाषेतील नावाचा अर्थच आहे भारताला जोडणारा पुल, आणि यासाठी कारणीभूत ठरतं ते कोल्हापूर ! तसं हे कारण म्हणजे एक शोकांतिकाच आहे. या पुलाजवळ कोल्हापूरचे नाव, संस्कृती आणि इतिहास गेली दीडशे वर्षे उभा आहे. इथंच, अर्नो नदीच्या काठावर आहे करवीरकर छत्रपती राजाराम यांची समाधी !!! आणि या समाधीच्या सानिध्यात बनवलेला हा पुल एक प्रकारे फ्लॉरेन्स शहराला कोल्हापुरशी जोडतो म्हणून नाव ही समर्पक दिलंय Bridge To India. आजच्या पिढीला या राजाराम महाराजांची थोडी फार ओळख असू शकेल. कारण त्यांनी पायाभरणी केलेल्या मेन राजाराम हायस्कूल बद्दलचा वाद सध्या गाजत आहे. असो. त्यावेळचे पॉलिटिकल रेसिडेंट अँडरसन यांनी राजाराम महाराजांच्या आग्रहावरून शाळेची जागा अगदी नगारखान्यालगतचं निश्चित केली. त्यासाठी...

ताराबाई रोड, जे. पी. नाईकांच्या कष्टाचे फळ...

Image
  ताराबाई रोड हा फक्त एक रहदारीचा रस्ताचं नाही तर तो रंकाळ्यावरून भक्तिभावाने केलेला नमस्कारही महाद्वारातून अंबाबाईचरणी पोचवतो. विश्वास बसत नसेल तर कधीतरी रंकाळा कमानी जवळ उभे रहा. कित्येक कोल्हापूरकर रंकाळा कमानीतूनच अंबाबाईला नमस्कार करताना दिसतील. पण याशिवाय ही या रस्त्याची एक वेगळी ओळख आहे. अस्ताव्यस्त आणि बकाल कोल्हापूर कडून नीटनेटक्या कोल्हापूर पर्यंतचा जो प्रवास अजून सुरूच आहे त्याचा प्रारंभ म्हणजे हाच रस्ता म्हणता येईल. आणि याचे श्रेय देता येईल ते फक्त जे. पी. नाईक यांनाच. पुढच्या काळात जागतिक शिक्षण तज्ञ म्हणून उदयाला आलेले जे. पी. नाईक १९४३ ते १९४६ च्या दरम्यान कोल्हापूर नगरपालिका आणि इलाखा पंचायतीच्या अनेक विभागांचे सेक्रेटरी होते. पण त्यांची कारकीर्द विशेष गाजली ती शहरविकास आणि सुधारणा खात्याचे अधिकारी म्हणूनच. डॉ. पी. सी. पाटील थोरात (जनरल थोरातांचे वडील) यांच्यामुळे नगरपालिकेच्या सेवेत आलेल्या जे.पी. नी पुढची पन्नास वर्षे डोळ्यासमोर ठेऊन शहर सुधारणेचा वास्तववादी आराखडा तयार केला, दरबारची मंजुरी मिळवली आणि सर्व कामाचे शास्त्रशुद्ध नियोजन करून बऱ्याच प्रमाणा...

एकेकाळच्या कोल्हापूरातले सरकारी सण आणि पद्धती...

कोल्हापूर हे मन लावून प्रथा पाळणारं आणि त्यापेक्षाही त्या प्रथा अभिमानानं मिरवणारं गाव आहे. टेंबलाबाईची जत्रा असो किंवा फुलाच्या दुकाना बाहेर रात्री टांगलेला हार असो. या अशा "पाडलेल्या पद्धती" कोल्हापूरकर कित्येक पीढ्या पाळत आहेत. विशेष म्हणजे यातल्या काही प्रथा राष्ट्रीय आहेत. राष्ट्रीय प्रथा म्हणजे नक्की काय असा प्रश्न फक्त कोल्हापूर बाहेरच्या माणसालाच पडेल. कारण पण या प्रश्नाचं उत्तर कोल्हापुरातल्या प्रत्येक घरात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला आणलेली गोड गोड जिलेबीच देईल. या प्रथांच मूळ शोधायला गेलं तर सापडतंच असं नाही, मात्र या प्रथा किती जुन्या आहेत हे मात्र उकलता येतं. आता या आपल्या राष्ट्रीय सणांच उदाहरण घ्या. सहज वाटेल की या दिवशीच्या कोल्हापुरातल्या पद्धती १९४७ पासून सुरू झाल्या असाव्यात. पण या बद्दल जरा खोलात गेलं की काही मजेदार माहिती मिळते आणि काही प्रश्नाचं उत्तर ही मिळतं.. त्याबद्दल थोडसं... स्वातंत्र्यपूर्व काळात, म्हणजे अगदी शाहू महाराजांच्याही आधी कोल्हापुरात दोन राष्ट्रीय किंवा सार्वजनिक सण अगदी सरकारी इतमामात आणि अगदी लोकांच्यात जाऊन साजरे केले जात. व्हिक्टोरि...

घुडणपीराची गाथा ....

Image
  पन्हाळा ही आदिलशाहीची उपराजधानी. त्याकाळातलं कोल्हापूर हे पन्हाळ्याजवळचं एक मोठं गाव, पेठच म्हणा की! साहजिकच कोल्हापूरवर पण आदिलशाही अंमल होताच. त्यामुळेचं पन्हाळा आणि कोल्हापूरात हा अंमल दाखवणारे त्याकाळचे शिलालेख सापडले आहेत. या आदिलशाही खुणा दाखवणारा कोल्हापुरातला आणखी एक धागा म्हणजे घुडणपीर दर्गा. याच दर्ग्याबद्दलची ही दंतकथा... हजरत सय्यद मुबारक घुडणपीर हे आदिलशाहाचे नामवंत सरदार होते. मुळचे अरबस्थानातले. कोल्हापूर आणि आसपासच्या भागात त्यांचा वावर असायचा. वाईला झालेल्या युद्धात ते मारले गेले. मांड घातलेल्या अवस्थेत शिर नसलेले त्यांचे धड घेऊन त्यांचा घोडा युद्धभूमीवरून कोल्हापूरात परत आला. कोल्हापुरात पोचल्यावर त्या घोड्यानेही आपले प्राण सोडले. त्यावेळचं कोल्हापूर म्हणजे फक्त एक खेडं. ओळख पटल्यावर त्यांच्या धडाचे दफन गावातल्याचं एका चिंचेच्या झाडाखाली करण्यात आले आणि तिथंच उभारला गेला तो घुडणपीर दर्गा !!! घोड्यावर बसून आलेला पीर म्हणून म्हणून बोली भाषेत याला घोडमपीर असंही म्हटलं जायचं. (हा संदर्भ कोल्हापूरच्या इस्लाम परंपरा या लेखात डॉ. सुर्रीया बाबासाहेब मकुभाई यांनी दिला आह...

वाहत्या बदलाचा बिंदू चौक

Image
  कोल्हापूर नगरपालिकेला १०० वर्षे पूर्ण झाल्यावर , बिंदू चौकाचा परिसर दाखवणारा १९५४ सालचा दुर्मिळ फोटो बदलत्या कोल्हापूरचा आढावा घ्यायचा म्हटला तर सुरुवात कोल्हापुरातले लोक कमरेला तलवार आणि फिरायला घोडा वापरायचे तेंव्हा पासून करायला लागते . हा बदल जाणवतो आठवणीं मधून. कधी ऐकलेल्या, कधी बघितलेल्या, कधी वाचलेल्या तर कधी मुद्दाम हुडकून काढलेल्या. आठवणी जरी जुन्या असल्या तरी, जसं गाव बदललं तसं त्या आठवणीत रमायला पण भारी वाटायला लागतं. आता बिंदू चौकाचंच बघा की.. नुसतं नावच नव्हे तर रुपडं पण बदलत गेलंय. आदीतवार वेस, रविवार बुरुज, रविवारातला पार, रविवार चौक अशी वेगवेगळ्या नावानं ओळख बदलत आज शेवटी बिंदू चौक हे नाव रुजू होऊन सत्तर पंच्याहत्तर वर्षे झालीत. या सर्व बदलाचा माग काढत आता बिंदू चौकातूनच फिरून येऊ. मुळात उगवतीला असणारी वेस आणि तटबंदी म्हणून या भागाचं नावच सूर्यावरून ठेवलेलं. आदितवार (रविवार) वेस. नंतरच्या काळात रविवारचा बाजार ही या वेशीबाहेरच भरायला लागला. त्यामुळे या भागात तटाबाहेर जी पेठ वसली ती पण याच रविवार वेशीचं नाव घेऊन. या वेशीतुन गावाबाहेर जायला ज्या पुलावरून जितीचा ओढा पा...

एक साधा फुलांचा हार...

Image
गंगावेशीवरच्या मागच्या लेखानंतर, लहानपणापासून ऐकलेल्या बघितलेल्या कोल्हापूरच्या आगळ्या वेगळ्या प्रथा डोळ्यासमोर यायला लागल्या. "जगात भारी आम्ही कोल्हापूरी" हे जेंव्हा समस्त कोल्हापूरकर अभिमानाने म्हणतात तेंव्हा त्याच्या पाठीमागे कोल्हापुरातल्या या आगळ्या वेगळ्या प्रथांचाही प्रमुख हात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या प्रथाच कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांना इतरांपेक्षा निराळं बनवतात. आज अशाच एका वेगळ्या प्रथेबद्दल......  अंबाबाईची शेजारती आटोपून जर कधी जोतिबा रोडवरच्या फुलांच्या दुकानावर नजर टाकलीत तर त्या बंद दुकानांबाहेर फुलांचा एक साधा हार अडकवलेला  दिसेल. हा साधासा फुलांचा हारच कोल्हापूरला इतर सगळ्या गावांपेक्षा वेगळं ठरवतो. बंद दुकानाबाहेर हार  ठेवण्याची ही प्रथा कधीपासून आहे ते नक्की माहीत नाही. पण आजही कोल्हापूरातले बरेच फुल आणि हारांचे दुकानदार रात्री दुकान बंद करून झाल्यावर एक हार दुकानाबाहेर अडकवून मगच घरी जातात. असं म्हटलं जातं की जगावं कुठंही पण मरायला मात्र कोल्हापूरात यावं..या मागं आध्यत्मिक, धार्मिक कारण जे काही असेल ते असेलच, पण हा एक साधा फुलांचा हार सुदधा त्याच...

गंगावेशीतलं वाजाप..

"रंगराव, गंगायेस आली, वाजाप थांबायला सांगा"... "आबा..ते काय सांगाय लागतंय व्हय.. वाजंत्र्यांनी पिपाण्या बंद कराय सुरुवात बी केली बगा".. माझ्या लहानपणी ऐंशीच्या दशकातला एखाद्या लग्नाच्या वरातीत नाहीतर अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत आढळणारा हा कॉमन संवाद.. आता यातले रंगराव, वाजंत्रीवाले आणि आबा बदलले तरी बदलली नाही ती गंगावेस आणि गंगावेशीत संगीत न वाजवण्याची प्रथा... पण हे वाजाप बंद का करायचं हे ना त्या रंगरावला माहीत असायचं, ना त्या आबाला.. असं हे कोल्हापूर...अनेक प्रथा पद्धती पोटात घेऊन आपण कोल्हापूरकर नित्य नेमाने जसं जमेल तसं या पाळायचा प्रयत्न करतोय, अगदी आज्ज्यापंज्ज्यापासून.. गंगावेशीची ही प्रथा आपल्याला घेऊन जाते एका वेगळया कोल्हापुरात.. माझ्यासारख्या जुनंपुरानं हुडकून काढणाऱ्याला या जुन्या , अंदाजे दीड दोनशे वर्षांपूर्वीच्या कोल्हापुरात शिरायला वेळ लागत नाही..लख्ख डोळ्यासमोर उभं राहातं. त्या कोल्हापूरला भरभक्कम दगडी तटबंदी होती. तटबंदी बाहेर खोल असा पाणी भरलेला, शेवाळलेला खंदक होता. मोजून ३५-३५ बुरुजांची ही तटबंदी. आणि या तटबंदीतुन आत बाहेर रहदारीसाठी  खिळे ठोकल...

जीवनाचा पाया रचणारे दौलु मास्तर...

Image
जीवनाचा पाया रचणारे दौलु मास्तर... तेंव्हा तर पेठेला शिवाजी पेठ नावही नव्हतं. नवा बुधवार पेठच म्हणायचे सगळे. तटाच्या बाहेर कोल्हापूर वाढलं तेंव्हा चंद्रेश्वर वाडीचाचं एक भाग नवा बुधवार म्हणून कोल्हापुरला चिकटला. तटातल्या कोल्हापूरपासून थोडा लांब असल्याने, सोयीसुविधा पण तशा कमीच. सगळी पेठ पोटासाठी शेतीवर, म्हशींवर आणि रंकाळ्यावर अवलंबून. ग्रामीण बाज ठासून भरलेला. रहाणीमान आणि पैशाची पडती बाजू. त्यामुळे नक्षीदार राजाराम हायस्कूलचं शिक्षण तसं पेठेतल्या पोरांच्या झेपेबाहेरच होतं. त्यामुळे पेठेतली पोरं शाळेऐवजी म्हसरांच्या मागेच रंकाळ्यावरच असायचीत. पण ही परिस्थिती बदलायचं एकाने ठरवलं. साडेपाच पावणेसहा फूट उंची, गव्हाळ रंग, कपाळावर भुवयांच्या मध्ये गुलालाची रेघ, पांढरा लांब अंगरखा, धोतर, डोक्यावर चक्री फेटा आणि त्यातून डोकावणारे लहानसे आवळ. अशा अवतारात तो माणूस घरोघरी फिरून शिक्षणाचे महत्व पटवून देत होता. स्वतः काढलेल्या शाळेत पोरांना घरोघरी फिरून खांद्यावरून आणत होता. आणि पदरमोड करून शिकवत होता. दीडशे वर्षांपूर्वीच्या कोल्हापुरात ही कल्पनाच थरारक होती. हा माणूस होता दौलतराव कृष्णाजी भोसले ...

बडा साहेब कोल्हापुरात येतो तेंव्हा......

Image
  गव्हर्नर, सर फिलिप वुडहाऊस पाहुण्याला डोक्यावर घ्यायची कोल्हापुरची परंपरा प्रसिद्धचं आहे. आजकाल तर पाहुण्यांच्या स्वागतासाठी सारं कोल्हापूर फ्लेक्सनीं भरून जातंय. कोल्हापुरची हीच ओळख अगदी दीडशे वर्षांपूर्वी सुद्धा होती. दीडशे वर्षांपूर्वी एक बडा सरकारी पाहुणा कोल्हापुरात आला आणि कोल्हापुरी पाहुणचार घेऊन भारावून गेला. त्याचीच ही गोष्ट, पुढल्या एक दोन भागात आपण घेऊ !! त्यावेळी कोल्हापूर कसं नटलं, मुरडलं हे बघत बघत त्यावेळच्या कोल्हापुरातही फेरफटका मारून येऊ.. चला !!   (सदर वर्णन हे प्रत्यक्षदर्शी व्यक्तीच्या कथनातून तत्कालीन घटनांशी आणि ठिकाणांशी सांगड घालून घेतले आहे.) साल १८७५-१८७६. कोल्हापुरात थोरल्या दवाखाना उभारायचं ठरवूनच बाल छत्रपती आणि कारभारी मुंबईत इंग्लंडच्या राजपुत्राला भेटून कोल्हापुरात परतले होते. इंग्रज सरकारशी झालेल्या चर्चेमुळे प्रत्यक्ष इंग्लंडचा राजपुत्र आता कोल्हापुरला भेट द्यायला येणार अशी हवा गावभर झालेली होती. पण ही नुसतीच अफवा होती. पण काही दिवसांनी अचानकच गावाचा नुर पालटला आणि नीटनेटकेपणा व स्वच्छतेची जंगी मोहीम रस्त्यारस्त्यावर सुरू झाली. ज्या वेगाने ...

The Hero of Kalapore

Image
१८५७ चा लढा, आपल्यासाठी स्वातंत्र्याची पहिली लढाई, तर ब्रिटिशांसाठी फक्त सैनिकांचा एक उठाव.  यात लढलेल्या दोन्ही बाजूंच्या सैनिकांचे ध्येय वेगवेगळे होते. एका बाजूला होती ती गुलामगिरीचे जोखड फेकून देण्याची प्रबळ इच्छा तर दुसऱ्या बाजूला साम्राज्यशाही टिकवण्याची धडपड. हा लढा चिरडण्यात आल्यावर जेत्यानी सोयीस्करपणे याचा इतिहास लिहिला. (अपवाद फक्त सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक १८५७ चा स्वातंत्र्य संग्राम !) अभिमानाची गोष्ट म्हणजे कोल्हापूर शहर आणि आसपाच्या परिसराला याच १८५७ च्या लढ्याचा वारसा लाभला आहे. कोल्हापूरच्या या शूर सैनिकांबद्दल जे काही तेंव्हा लिहिलं गेलं ते ब्रिटिश इतिहासकार आणि त्या वेळचे काही ब्रिटिश वृत्तपत्रे यातूनच..अर्थातच या लेखनात ब्रिटिशांचाच उदोउदो आहे पण त्यामुळेच कोल्हापूरच्या शूर सैनिकांच्या कर्तुत्वाची महती समजते. याचंचं एक उदाहरण !!! The Hero of Kalapore..... १८५९ मध्ये लंडन मध्ये विल्यम टोपाझ मॅकगॉनॅगल या कवीची ही कविता. यातलं Kalapore म्हणजेच आपलं कोल्हापूर !!! लेफ्टनंट विल्यम अलेक्झांडर केर या २६ वर्षाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने १० जुलै १८५७ रोजी कोल्हापुरच्या बंडवा...

ब्रिटिशांची स्मृती जागवणारे मृत्यूलेख !!!

Image
कधीतरी बावड्याकडे जाताना, सायबाच्या तळ्याच्या आधीच, उजवीकडे वाट वाकडी करा. सुरुवातीचा थोडा चढ संपल्यावर डाव्या हाताला एक पुरातन वास्तू निवांत उभी असलेली दिसते. निवांतच, कारण जवळच असलेल्या शासकीय इमारतींच्या गजबजाटात देखील इथला निवांतपणा ठळकपणे अनुभवायला येतो. एकेकाळी कोल्हापूरबद्दलच्या ब्रिटिशांच्या भूमिका ज्या रेसिडेन्सी परिसरातून ठरवल्या जात, त्याच रेसिडेन्सीतली अजूनही सामान्य लोकांना सहज बघता येऊ शकते अशी ही वास्तू. ऑल सेंट्स चर्च...   All Saints Church, Residency Kolhapur   एका जमान्यात चर्च ऑफ इंग्लंडच्या थेट अखत्यारीत आणि बिशप ऑफ बॉम्बेच्या अधिकार क्षेत्रात असलेलं हे चर्च आजही तेवढयाच निगुतीने सांभाळलं जातंय. कोल्हापुरात ब्रिटिशांनी ज्या काही ठळक वास्तू उभ्या केल्या, त्यात अतिशय कमी खर्चात, कुठलीही कलाकुसर न करता परंतु तितकीच उठावदार अशी ही वास्तू म्हणता येईल. रेसिडेन्सीतल्या इतर कुठल्याही वास्तुशी या चर्चइतक्या घटना जोडल्या गेलेल्या नाहीत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईचे बिशप हेन्री डग्लस यांच्या स्मरणार्थ या चर्चची योजना झाली. रेसिडेन्सीतल्या ब्रिटिशांना प्रार...

जुनं कोल्हापूर सापडतं लंडनमध्ये ...

Image
कोल्हापुरवर प्रेम करणाऱ्या सर्वांनांच जुन्या कोल्हापूरची भुरळ पडलेली असते. हे जुनं कोल्हापूर आत्तापर्यंत लोकांनी फक्त ऐकलं होतं किंवा वाचलं होतं पण हे कोल्हापूर त्यांना कधी बघायला मिळालं नव्हतं. आजकाल मोबाईलमध्ये जुन्या कोल्हापूरचे फोटो व्हायरल व्हायला लागले कोल्हापूरचं हे ही दर्शन घडायला लागलं.  भुरळ पडण्यासारखं या कोल्हापुरात काय होतं? ग्रामीण बाज, युरोप आणि भारतातील विविध शैलींच्या देखण्या इमारती, शहराला वेढून वाहणारी पंचगंगा, रंकाळ्याचा वारा, रस्त्यावरून ये जा करणारे म्हशींचे तांडे आणि पोटापाण्याच्या उद्योगाला लागलेली माणसं. पण हे तर आजच्या कोल्हापुरात पण आहे. भुरळ पडते ती त्या काळातल्या शांततेची. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर अंबाबाईच्या देवळाचं घ्या. सत्तर ऐंशीच्या दशकापर्यंत बालपण कोल्हापूरात काढलेल्या लोकांना आजच्या अंबाबाईच्या देवळातली गर्दी गोंगाट नको वाटत असेल. बदल हाच शाश्वत आहे. पण जुन्या कोल्हापुराच्या आठवणीत रमू नये असं थोडंच आहे ? आजच्या इंटरनेटच्या जमान्यात फक्त Old Kolhapur Image s इतकं जरी टाईप केलं तरी तीस पस्तीस असे काही फोटो दिसतात की माणूस दोन तीन मिनिटे खिळला ...