Posts

Showing posts from June, 2023

कवतिक नगारखान्याचं...

Image
आपल्याच काळजाजवळच्या गोष्टीचं कौतुक जेंव्हा बाहेरची लोकं करतात तेंव्हा तेच काळीज सुपा एवढं होतं. कोल्हापूराबाहेर राहताना कोल्हापुरी जेवण, माणसं , रांगडी भाषा यांचं कौतुक बऱ्याच वेळा मी ऐकतो, पण हे असं कौतुक जेंव्हा सातासमुद्रापार केलं जातं , आणि ते पण दीड एकशे वर्षांपूर्वी, तेंव्हा जो feel येतो ,त्याची सर कशालाच नाही. आज कोल्हापूरात नेहमी डोळयांसमोर असणाऱ्या वास्तू इतक्या सवयीच्या झाल्यात, डोळ्यात बसून गेल्यात की त्यांचं ऐतिहासिक, सांस्कृतिक मोल आपण एकतर विसरून गेलोय किंवा माहीतच करून घेतलेलं नाही. मुद्द्यावर येतो. शहराचं वैभव आणि मानबिंदू असणारा जुन्या राजवाड्याचा नगारखाना (चुकीचा उल्लेख, भवानीमंडप) किती लोकांनी निरखून, खास वेळ काढून बघितला असेल. गरजच वाटली नसेल. पण ही गरज वाटली होती ब्रिटिशांना, ती पण दीडशे वर्षांपूर्वी.. शनिवार,३ एप्रिल १८५८, द इलस्ट्रॅटेड लंडन न्युज ( The Illustrated London News)   या, लंडनमध्ये प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकाचा अंक (जवळपास १६२ वर्षांपूर्वीचा) ,खाली image मध्ये देतोय. पहिल्या पानावर काय दिसतंय बघा.. आपलाचं नगारखाना !!! य...