Posts

Showing posts from December, 2024

कोल्हापूर 5593

Image
१९४१-४२ चा काळ... दुसरं महायुद्ध त्याच्या चरण सीमेवर पोहोचतच होतं. अजून एखाद्या वर्षातच हिटलरचा पडता काळ सुरू होणार होता. पण त्यासाठी इंग्लंड आणि अमेरिकेने निर्णायक आघाडी उघडणं भाग होतं. इंग्रजांचा एक गुण वाखाणण्यासारखा आहे. भविष्यात एखादी घटना घडेल की नाही, याचा थांग नसलातरी ती आपल्याला अनुकूलच  घडेल, असा पवित्रा घेऊनच ते पुढल्या जोडणीला लागतात. त्यामुळेच उद्या युद्ध जिंकल्यावर जगाची जी फेरमांडणी होईल ती आपल्याला मनासारखी व्हावी यासाठी चर्चिल आणि रुजवेल्ट यांच्यात शिखर बैठका सुरू झाल्या होत्या. वॉशिंग्टन डी सी मधील अशाच एका बैठकीला हजर राहून चर्चिल लिव्हरपूलहून लंडनला परत येत होते. ही बैठक म्हणजे भविष्यात तयार होणाऱ्या North Atlantic Territorial Organisation (NATO) ची नांदी होती. इंग्लंड बेचिराख करण्याचा हिटलरचा मनसुबा जाहीरच असल्याने विमान वापरणे म्हणजे जोखीमच. त्यामुळे रेल्वेमार्गाने चर्चिल परतत होते. रुळांचा “ खडखड ” आणि वाफेच्या इंजिनाचा तो विशिष्ट “ भक भक ” असा आवाज यांची जोड चर्चिल यांच्या विचारांना मिळाली होती. अशाच एखाद्या वळणावर जर त्यांचं लक्ष खिडकीतून त्या रेल्वेच्या इ...