Posts

Showing posts from October, 2022

क्रांतीची धग झेलणारा कोल्हापुरातला ब्रिटिश राजपरिवार !!!

Image
  सन १९१४ मध्ये जगातल्या प्रमुख देशातल्या वृत्तपत्रांत कोल्हापूरसंदर्भात एक बातमी झळकली आणि कोल्हापूरचे नांव अचानकपणे चर्चेत आलं.  बातमी होती ती पुतळ्यांच्या विद्रुपीकरणाची. पण हे पुतळे सामान्य व्यक्तींचे नव्हते. शिवाय एखाद दुसरा पुतळा फोडला गेला नव्हता, तर पाच सहा पुतळ्यांची एकाच वेळेस नासधूस करण्यात आली होती. हे पुतळे होते इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया आणि तिच्या कुटुंबीयांचे !!! त्यामुळे या प्रकरणाची वाच्यता साऱ्या जगभरात झाली. सुरुवात पुतळ्यांच्या स्थापनेासूनच करू. शाहू महाराज आणि ब्रिटिश सरकार यांच्यात नेहमीच सख्य राहिलं होतं. या मैत्रीचं प्रतीक म्हणून शाहू महाराजांनी विक्टोरिया राणीचा पुतळा त्याच्या सुंदर अशा मेघडंबरीसह शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या बागेत बसवला होता. १९०८ मध्ये मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क याच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं. विशेष म्हणजे शाहू महाराजांच्या राजकन्येच्या लग्नाचाच हा दिवस होता. पुढे १९११ साली इंग्लंडचा राजा अल्बर्ट एडवर्ड मृत्यू पावल्यावर एक श्रध्दांजली सभा टाऊन हॉल मध्ये भरली आणि त्या सभेत शाहू महाराजांनी या अल्बर्ट एडवर्ड...

ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं !!!

Image
ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं !!! कुदळीचा घाव बसला आणि दगडी चौथऱ्याचं झाकण उघडून आतली गोलाकार पारदर्शक पेटी उचकटली गेली. जमिनीवर पडली. फुटली. आणि आतली धूळ, राखंच म्हणा की, सगळीकडे पसरून विरून गेली. दिवस होता २७ ऑक्टोबर १८७७. कोल्हापुरच्या इतिहासातला सर्वात महत्त्वाचा परंतु दुर्लक्षित दिवस. अंधाऱ्या रात्री आकाशात वीज चमकून एखादी दुर्मिळ वस्तू फक्त काही क्षण दिसावी आणि पुन्हा कधीच न सापडण्यासाठी अंधारात हरवून जावी असा प्रसंग कोल्हापूरसाठी या दिवशी घडला. कोल्हापुरच्या इतिहासात सर्वात जुनी, अगदी दोन अडीच हजार वर्षे पुरातन अशी एक मानवी निर्मिती अपघातानेच सापडली आणि पुढच्या काही काळात पुन्हा कधीच न दिसण्यासाठी हरवून गेली तो हा दिवस !!!  खाराळा बाग ! कोल्हापूरच्या तटबंदीपासून पुर्वेकडे असणारा आणि आजच्या लक्ष्मीपुरीचा, आईसाहेब महाराज पुतळ्यापासून जयंती ओढ्यापर्यंत पसरलेला  थोडा उताराचा भाग. उत्तरेकडे हीच खाराळा बाग चौफाळ्याच्या माळापर्यंत म्हणजे आजच्या दसरा चौकापर्यंत विस्तारलेली. तसा त्याकाळच्या मानाने गावाबाहेरचाच परिसर. या बागेत एक दोन बंगले.  यातल्याचं एका बंगल्या सभोवती असण...