Posts

Showing posts from August, 2022

कोल्हापुरातली सर्वात पहिली शिवप्रतिमा साकारताना ....

Image
कोल्हापूरातलं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज चौक. तिशी चाळिशीच्या पुढच्या पीढीसाठी या ठिकाणचा उल्लेख फक्त शिवाजी पुतळा किंवा शिवाजी चौक असा केला तरी चालतो, कारण हृदयांतरीचे छत्रपती असलेल्या महाराजांना छत्रपती म्हणून संबोधलं नाही, तर अवमान होतो अशी नवी समज येण्याआधी मोठी झालेली ही पीढी !!  न्यूयॉर्कसाठी टाइम्स स्क्वेअरचं जे महत्त्व, त्याहून काकणभर चढच, महत्व कोल्हापूरसाठी या चौकाचं !! कोल्हापूरच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उलाढालींचा साक्षीदार हाच चौक! या चौकाची जागा तशी पहिल्यापासून मोक्याची. तटबंदी असताना राजवाड्या समोरची म्हणून मानाची शनिवार वेस ही इथंच होती. नंतरच्या काळात इंग्रजी अंमल दाखवणारा लेस्ली विल्सन पुतळा आणि फेरीस मार्केट याच चौकात वसले. पण खऱ्या अर्थाने हा चौक गाजला तो शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यावर. हाकेच्या अंतरावर असलेल्या बिंदू चौकात अनेक राजकीय, सामाजिक चर्चा नेहमी घडतात पण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होते ती मात्र इथंच महाराजांच्या पुतळ्याला हार घालून. आता परंपराच आहे ती. भारताने कुठल्याही क्षेत्रात अत्युच्च यश मिळवल्यावर होणाऱ्या कोल्हापूरातल्य...