Posts

Showing posts from August, 2021

अनेक बदलांचा मूक साक्षीदार .... आईसाहेब महाराज पुतळा ...

Image
गाव वसलं की लगेच त्या गावाचा इतिहास सुरू होतो.गावाचं कालच वर्तमान हा आजचा इतिहास असतो आणि आजचा वर्तमान उद्यासाठी इतिहास !!! या नियमाने कोल्हापूर शहराचा इतिहास इतका मोठा आहे की लिहायला खंडीभर कागदं ही कमी पडतील. कोल्हापूरच्या इंचा इंचाला बदलाचा इतिहास आहे. हा बदल सामाजिक ,आर्थिक आहेच पण मनोरंजन करणाराही आहे. सर्वसामान्य उदाहरण घ्यायचं झालं तर बिंदू चौकाचं सांगता येईल. पण त्यापेक्षाही रंगतदार इतिहास आहे तो,   आईसाहेब महाराज पुतळा चौक आणि परिसराचा !! आजचा गर्दीचा हा परिसर अनेक बदल पचवून आजच्या रुपात आपल्यासमोर उभा आहे. कोल्हापूर शहर, पाण्याच्या डबक्यात, फुलांच्या झुबक्यात, अंबाबाई।। कोल्हापूर शहर, विंचवाचे तळे, वस्ती केली तुझ्यामुळे, अंबाबाई।। या ओवीत असणाऱ्या अनेक तळ्यांपैकी एक विस्तीर्ण तलाव याच परिसरातला...   त्यावेळचं नाव महार तलाव. करवीर महात्म्यातलं नाव रुद्रतीर्थ!!!   व्हिक्टोरियन काळात कोल्हापूर नगरपालिकेच्या १८८९च्या ठरावानुसार पुढल्या काळात शहरवाढ,सुधारणा आणि स्वच्छतेसाठी जी काही तलावं, तीर्थ मुजवली गेली त्यापैकी एक. आजचं नेमकं स्थान सांगायचंच तर शाहू क्लॉथ मार्केट...