Posts

लक्ष्मी विलास : कोल्हापूरच्या माणुसकीचा जिवंत दस्तऐवज...

Image
कोल्हापूरच्या अनेक पिढ्या येथील ऐतिहासिक वास्तू आणि तीर्थक्षेत्रांचा वारसा सांगत घडून गेल्या. पण कोल्हापूर हे फक्त इतिहासाच्याच परिघात मावणारे शहर नाही. कोल्हापूरच्या मोठेपणाला माणुसकीचीही एक सुंदर किनार आहे. त्यामुळेच, देश सोडून परागंदा झालेला " एक जर्मन डॉक्टर " आणि " त्याच्याच देशाने छळलेले काही लोक " यांच्या नियतीची गाठ जेंव्हा कोल्हापुरात पडली, तेव्हा कोल्हापूरच्या इतिहासात एक आगळावेगळा अध्याय लिहिला गेला. आणि या अध्यायाचा साक्षीदार बनली अशी एक वास्तू, जिचे संपूर्ण कोल्हापूरवर आधीपासूनच न फिटणारे ऋण आहे. ही गोष्ट आहे जर्मन ज्यू डॉक्टर डॉ. एडमंड रोझेनबाम आणि राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या " लक्ष्मी विलास पॅलेस " यांची आणि त्याचबरोबर, त्यांच्या सहवासात घडलेल्या मानवतेच्या एका अपरिचित अध्यायाची! याची सुरुवात जुलै १९४३ मध्ये झाली. वळीवड्याच्या माळावर कॅम्प आकाराला आला आणि पोलंडचे नागरीक टप्प्याटप्प्याने त्यात वस्तीला आले. शक्य तितक्या नागरी सुविधा कोल्हापूरकरानी पुरवलेल्या होत्याच. पण दवाखाना मात्र अजून बांधून पूर्ण झालेला नव्हता. त्यामुळे गंभ...

विम्बल्डन आणि कोल्हापूरचं अनोखं नातं, " कोल्हापूर कप "

Image
  " इंग्लंडने कॅनडाला हरवून विम्ब्लडन येथे पहिला कोल्हापूर कप जिंकला." जुलै १८७१... " इंग्लंडने १०० व्या वेळेला अतिशय मानाचा असा कोल्हापूर कप जिंकला." जुलै २०२३... विश्वास बसणार नाही अशा या बातम्या आहेत. पण तब्बल १५२ वर्षांपासून, प्रत्येक जुलै महिन्यात, इंग्लंड आणि जिथं जिथं राणीचं राज्य रुजलं अशा गोऱ्या वसाहतींमधल्या वर्तमानपत्रात कुठलाही खंड न पडता त्या प्रसारित होत आहेत. फक्त विजेत्या आणि उपविजेत्या संघाचं नाव त्यांच्या कामगिरीनुसार दरवर्षी बदलेलं असतं. दीडशे वर्षांहून अधिक काळ राणीच्या देशात, कोल्हापूरच्या नावाची एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा अखंडितपणे सुरू आहे याची कल्पना खुद्द कोल्हापूरकरांनाही नसेल, नव्हे नाहीच ! सामान्यपणे आम्हा कोल्हापूरकरांची " जग " ही संकल्पना, दक्षिणेला कात्यायनीच्या डोंगरापासून सुरू होऊन, रंकाळ्याच्या काठाकाठाने, पेठेतील गल्ल्या ओलांडून, अंबाबाईला नमस्कार करत करत, गूळ, मिसळ आणि तांबडा पांढरा रस्सा यांच्याभोवतीच गोल गोल फिरत, उत्तरेला पंचगंगेच्या काठी येऊन थांबते. त्यामुळे पंचगंगेच्या पलीकडेही असलेल्या जगात कोल्हापूरकरानी जे अफाट ...

कोल्हापूर 5593

Image
१९४१-४२ चा काळ... दुसरं महायुद्ध त्याच्या चरण सीमेवर पोहोचतच होतं. अजून एखाद्या वर्षातच हिटलरचा पडता काळ सुरू होणार होता. पण त्यासाठी इंग्लंड आणि अमेरिकेने निर्णायक आघाडी उघडणं भाग होतं. इंग्रजांचा एक गुण वाखाणण्यासारखा आहे. भविष्यात एखादी घटना घडेल की नाही, याचा थांग नसलातरी ती आपल्याला अनुकूलच  घडेल, असा पवित्रा घेऊनच ते पुढल्या जोडणीला लागतात. त्यामुळेच उद्या युद्ध जिंकल्यावर जगाची जी फेरमांडणी होईल ती आपल्याला मनासारखी व्हावी यासाठी चर्चिल आणि रुजवेल्ट यांच्यात शिखर बैठका सुरू झाल्या होत्या. वॉशिंग्टन डी सी मधील अशाच एका बैठकीला हजर राहून चर्चिल लिव्हरपूलहून लंडनला परत येत होते. ही बैठक म्हणजे भविष्यात तयार होणाऱ्या North Atlantic Territorial Organisation (NATO) ची नांदी होती. इंग्लंड बेचिराख करण्याचा हिटलरचा मनसुबा जाहीरच असल्याने विमान वापरणे म्हणजे जोखीमच. त्यामुळे रेल्वेमार्गाने चर्चिल परतत होते. रुळांचा “ खडखड ” आणि वाफेच्या इंजिनाचा तो विशिष्ट “ भक भक ” असा आवाज यांची जोड चर्चिल यांच्या विचारांना मिळाली होती. अशाच एखाद्या वळणावर जर त्यांचं लक्ष खिडकीतून त्या रेल्वेच्या इ...

सिंक्लेअरचा बंगला ... The Palace of Sinclair...

Image
सिंक्लेअर बंगला कोल्हापूर ट्रंक रोड आणि कोल्हापूर मेल रोड ही रस्त्यांची नावं, आजच्या काळात तशी डोक्यावरून जाणारीच ! पण, हे दोन रस्ते म्हणजे कोल्हापूरचा भूतकाळ जिवंत करणारे राजमार्गच आहेत. यातला कोल्हापूर मेल रोड म्हणजे आजचा पुणे बंगलोर हायवे. याच्यावरचा ऐतिहासिक पूल काल-परवाच आपण इतिहासात जमा करून टाकला. (ऐतिहासिक का ? कारण हा कोल्हापूर संस्थानातला सर्वात पहिला पूल.) पण हे असं दुर्दैव कधीही कोल्हापूर ट्रंक रोडवर येणार नाही याची खात्री बाळगा. कारण या ट्रंक रोडवर पावला पावलावर कोल्हापूरच्या भूतकाळात शिरायचे दरवाजे अजूनही शाबूत आहेत. या ट्रंक रोडमुळेच कोल्हापूरला स्वतःचा एक वारसा निर्माण करता आलाय. आणि याच कोल्हापूर ट्रंक रोडवर जवळपास दीडशे वर्षे उभा आहे “ Palace of Sinclair ” सिंक्लेअरचा बंगला ! होय, बंगलाच !. याच्याबद्दल माझ्याकडे तशी ओझरती माहिती होती पण नक्की ठिकाण काही गवसले नव्हते. नव्याने काही गोष्टी वाचण्यात आल्या आणि जागेची निश्चिती झाली. प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन वाचलेल्या गोष्टींचा पडताळा घेतला. आणि समोर आला धडधाकट, एकही चिरासुद्धा न हललेला  सिंक्लेअरचा बंगला  ! मला त...