फेरिस मार्केट
तसे बघायला गेलं तर जुन्या कोल्हापूरबद्दलचे विषय भरपूर आहेत डोक्यात, पण डोक्यातनं बोटांत आणि बोटातून तुमच्या स्क्रीनवर बाहेर पडायला मुहूर्त काही लागत नव्हता.. खरी बत्ती दिली ती Yashodhan Joshi नी ओळख करून दिलेल्या फेरीसच्या दीर्घायुषी पोपटाने. आणि या फेरीसने डोकं चावायला सुरुवात केली. तर आजचा विषय फेरीस (Colonel W B Ferris).. आजच्या कोल्हापूरला मध्ययुगीन आणि रोगराईनें बरबटलेले एक गाव ते काही सुंदर इमारतींच शहर म्हणून नवा चेहरा देण्यामागे ज्या काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी घाम गाळला त्यांच्यापैकी हा कर्नल फेरीस..१८७१ ला असिस्टंट पोलिटिकल एजंट म्हणून कोल्हापुरात आलेला हा फेरीस १९०६ ला निवृत्त होई पर्यंत कोल्हापूरकरांच्या एक दोन पिढ्या त्याच्या हाताखालुन गेल्या. याच काळात कोल्हापूरची तटबंदी पाडली गेली, खंदक भरले गेले. या दोन्ही गोष्टींना परंपरावादी कोल्हापूरकरांचा इतका टोकाचा विरोध होता की रामभट कडेकर नावाच्या माणसाने या फेरीसविरुद्ध बंड पुकारले. फेरीसविरुद्ध सरकारात तक्रारींचा पाऊस पाडण्यात आला, त्याच्यावर हल्ला करायची पण तयारी करण्यात आली. शेवटी Win Win situati...