Posts

Showing posts from June, 2026

लक्ष्मी विलास : कोल्हापूरच्या माणुसकीचा जिवंत दस्तऐवज...

Image
कोल्हापूरच्या अनेक पिढ्या येथील ऐतिहासिक वास्तू आणि तीर्थक्षेत्रांचा वारसा सांगत घडून गेल्या. पण कोल्हापूर हे फक्त इतिहासाच्याच परिघात मावणारे शहर नाही. कोल्हापूरच्या मोठेपणाला माणुसकीचीही एक सुंदर किनार आहे. त्यामुळेच, देश सोडून परागंदा झालेला " एक जर्मन डॉक्टर " आणि " त्याच्याच देशाने छळलेले काही लोक " यांच्या नियतीची गाठ जेंव्हा कोल्हापुरात पडली, तेव्हा कोल्हापूरच्या इतिहासात एक आगळावेगळा अध्याय लिहिला गेला. आणि या अध्यायाचा साक्षीदार बनली अशी एक वास्तू, जिचे संपूर्ण कोल्हापूरवर आधीपासूनच न फिटणारे ऋण आहे. ही गोष्ट आहे जर्मन ज्यू डॉक्टर डॉ. एडमंड रोझेनबाम आणि राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या " लक्ष्मी विलास पॅलेस " यांची आणि त्याचबरोबर, त्यांच्या सहवासात घडलेल्या मानवतेच्या एका अपरिचित अध्यायाची! याची सुरुवात जुलै १९४३ मध्ये झाली. वळीवड्याच्या माळावर कॅम्प आकाराला आला आणि पोलंडचे नागरीक टप्प्याटप्प्याने त्यात वस्तीला आले. शक्य तितक्या नागरी सुविधा कोल्हापूरकरानी पुरवलेल्या होत्याच. पण दवाखाना मात्र अजून बांधून पूर्ण झालेला नव्हता. त्यामुळे गंभ...