Posts

Showing posts from May, 2022

काळा घोडा मुंबईचा, वारसा मात्र कोल्हापूरचाही !!!

Image
प्रिन्स ऑफ वेल्श उर्फ अल्बर्ट एडवर्ड याचा हा पुतळा त्याच्या पेक्षा त्याच्या काळ्या घोड्याच्या नावानेच ओळखला जायचा . कोल्हापुरला वारसा समृद्ध शहर बनवण्यात करवीरकर छत्रपती आणि करवीरची जनता यांच्याबरोबरच ब्रिटिशांचाही मोलाचा वाटा आहे. रॉयल रोड म्हणजे आजच्या भावसिंगजी रोडच्या दुतर्फा उभ्या असलेल्या जुनी न्यायाधीश कचेरी, टाऊन हॉल, सी पी आर हॉस्पिटल, राजाराम हायस्कूल यासारख्या इमारतींचा कालातीत वारसा उभारण्यामागे करवीर दरबारची इच्छाशक्ती,अर्थशक्ती आणि ब्रिटिश सरकारची क्रीयाशक्ती हेच कारणीभूत आहेत. चार्ल्स मॅन्ट, वॉल्टर डकेट, आर. जे. शानोन यासारख्या कल्पक ब्रिटिश अभियंत्यांनी मध्ययुगीन कोल्हापूर बदलून टाकलं आणि आजचं कोल्हापूर उभा केलं.  मुळात कोल्हापुरची भौगोलिक परिस्थती दक्षिण मराठी संस्थनांवर वचक ठेवण्यास सोयीची असल्याने कोल्हापूर ब्रिटिशांचे लाडकं शहर होतं. ज्याप्रमाणे मुंबईला पूर्वेकडील लंडन बनवण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती, त्याच धरतीवर कोल्हापूरला दक्षिण महाराष्ट्रातील मुंबई बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता हे या सर्व इमारती बघून दिसतं. कोल्हापूरचे छत्रपती आणि ब्रिटिशांचे संब...