एका उत्खननाची पहिली गोष्ट , सगळ्यात पहिली !!!!
सर्वसाधारणपणे एखाद्या शहराची प्रगती त्या शहराचा वारसा गिळंकृत करते. पण कोल्हापूरच्या बाबतीत मात्र, होणाऱ्या प्रगतीमुळे वारसा उघडकीला येण्याचं दुर्मिळ उदाहरण घडलं. आणि पुढे थोड्याफार प्रमाणात हा वारसा जपला गेला. मी ब्रम्हपुरी बद्दल बोलतोय. या प्रकरणाचा एकंदर एक वेगळाच कोन समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. शिवाजी पुलाच्या उजवीकडे दिसणारा ब्रम्हपुरी टेकडीचा आजचा परिसर ब्रम्हपुरी !!!! कोल्हापूरात सध्या trending मध्ये असणारा विषय. नागरी प्रशासन आणि पुरातत्व खाते यांच्यात सुरू असलेली जुगलबंदी आणि ती असहायपणे टेनिसकोर्टवरच्या बॉल प्रमाणे पाहणारा सामान्य नागरिक, अशी आजची परिस्थिती आहे. या भागातली अतिक्रमणे आणि पुरातत्व खात्याचा १०० मीटरचा नियम या गुंत्यात मला अडकायचं नाही, पण या वादाच्या मुळापर्यंत मात्र तुम्हाला घेऊन जायचयं. सर्वसाधारणपणे मागे कधीतरी ब्रम्हपुरीवर उकराउकरी (कोल्हापूरी शब्द) होऊन कसल्यातरी मूर्ती सापडल्यात एवढीच आसपासच्या रहिवासी आणि सामान्य कोल्हापूरकरानां असलेली माहिती. तसं बघायला गेलं तर कोल्हापूर इतकं जुनं आहे की गावातल्या कुणाच्याही परड्यात उकरलं तरी क...