कवतिक नगारखान्याचं...
आपल्याच काळजाजवळच्या गोष्टीचं कौतुक जेंव्हा बाहेरची लोकं करतात तेंव्हा तेच काळीज सुपा एवढं होतं. कोल्हापूराबाहेर राहताना कोल्हापुरी जेवण, माणसं , रांगडी भाषा यांचं कौतुक बऱ्याच वेळा मी ऐकतो, पण हे असं कौतुक जेंव्हा सातासमुद्रापार केलं जातं , आणि ते पण दीड एकशे वर्षांपूर्वी, तेंव्हा जो feel येतो ,त्याची सर कशालाच नाही.
आज कोल्हापूरात नेहमी डोळयांसमोर असणाऱ्या वास्तू इतक्या सवयीच्या झाल्यात, डोळ्यात बसून गेल्यात की त्यांचं ऐतिहासिक, सांस्कृतिक मोल आपण एकतर विसरून गेलोय किंवा माहीतच करून घेतलेलं नाही.
मुद्द्यावर येतो.
शहराचं वैभव आणि मानबिंदू असणारा जुन्या राजवाड्याचा नगारखाना (चुकीचा उल्लेख, भवानीमंडप) किती लोकांनी निरखून, खास वेळ काढून बघितला असेल. गरजच वाटली नसेल. पण ही गरज वाटली होती ब्रिटिशांना, ती पण दीडशे वर्षांपूर्वी..
शनिवार,३ एप्रिल १८५८, द इलस्ट्रॅटेड लंडन न्युज ( The Illustrated London News)
या, लंडनमध्ये प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकाचा अंक (जवळपास १६२ वर्षांपूर्वीचा) ,खाली image मध्ये देतोय. पहिल्या पानावर काय दिसतंय बघा..
असो, बातमीत चिमासाहेब महाराजांच्या बंडासदर्भात उल्लेख आलाय आणि पुढं लिहिलंय हा gateway काळ्या marble मध्ये असून, आतून आणि बाहेरून अतिशय सुंदर आहे. पण याच्या तीन बाजूनी ज्या इमारती आहेत त्या याला शोभत नाहीत, पण त्यामुळेच याचं देखणेपण अजून खुलतं..
पुढे लिहितात, शहराच्या तटाबुरुजांवर चार ते बारा पौंडी तोफा तैनात आहेत पण त्याही दारुगोळा नसलेल्या. त्यामुळे शहरावर कबजा करायला काही विशेष श्रम पडले नाहीत.
अतिशय दाट गर्दीच आणि अस्वच्छ शहर असं कोल्हापूरचं वर्णन ते करतात.१८४८ साली सुरू झालेल्या शहर स्वच्छतेच्या कामकाजाबद्दल उल्लेख केलाय.( त्याचाच एक भाग म्हणून पुढच्या काळात तटबंदी पाडली).
ज्या काळात जग जवळ आलेलं नव्हतं, परिचितही नव्हतं, अशा काळात सातासमुद्रापार आलेली ही बातमी, आणि त्यातली ही वास्तू किती महत्त्वाची असतील ?
आता आपल्याकडची माहिती...
हा नगारखाना १८३४ च्या ऑक्टोबरमध्ये बांधून पूर्ण झाला. त्यावेळचे छत्रपती, बुवासाहेब महाराज यांनी उत्तर हिंदुस्तानातून कसबी लोक आणून याचं बांधकाम केलं.
हा नगारखाना अतिशय घोटीव दगडाचा असावा अशी बुवासाहेब महाराजांची इच्छा होती.असा दगड शेवटी जोतिबाच्या डोंगरात मिळाला. हा दगड जोतीबावरून कोल्हापुरात आणणे म्हणजे कष्टाचं काम..शेवटी महाराज स्वत: पाच हजार लोक घेऊन जोतीबावर गायमुख जवळ छावणी करून राहिले. आणि शेवटी रेडे, बैलांच्या पाठीवरन केर्ली, आणि केर्लीतुन कासारी नदीतून प्रयाग, आंबेवाडी मार्गे पंचगंगेतून होड्यांमधून कोल्हापूरात ,असा या दगडांचा प्रवास झाला.
हा नगारखाना बांधण्यासाठी जो रॅम्प तयार केला होता त्याची सुरुवात त्यावेळच्या शनिवार वेशीतून व्हायची, म्हणजे आजच्या शिवाजी पुतळा चौकातून !!!
करवीर रियासत असं सांगते की भाद्रपद वद्य त्रयोदशीला हा नगारखाना लोकांसाठी खुला झाला.म्हणजे म्हाळाच्या महिन्यात !!!! म्हणजे एक तर उल्लेख तरी चुकीचा असावा किंवा कोल्हापूरकराचं पुरोगामीत्व अगदी तेंव्हापासूनचं असावं..😀😀😀😀
कोल्हापूरकरांच्या कित्येक पिढया याच्या खालून आल्या गेल्या. कोल्हापूरकरांच्या वाहनांनी विशेषतः KMT ने याच्या भिंती धुराने काळवंडण्यात मोलाचा हातभार उचलला होता. आता कुठे हा परिसर थोडा मोकळा श्वास घेतोय असं वाटतंय, पण ते ही पुरेसं नाही. बघा काही अजून करता येईल का ?
(बुवासाहेब महाराज म्हणजे चिमासाहेब महाराजांचे वडील, जर चिमासाहेब महाराज कोण हे माहीत नसेल तर मात्र अवघड आहे. पन्हाळ्याला जाणाऱ्या एस टी बसेस दसरा चौकातून पुढे जाऊन टाऊन हॉल म्हणून ज्या स्टॉपला थांबतात ,त्या बागेवर एक नजर मारून यावी).
.
© भारत पांडुरंग महारुगडे
संदर्भ:
ज्यांना पाहिजेत त्यांनी सांगा, लगेच देतो..
(माहिती माझ्या नावासहित शेअर करण्यास् माझी हरकत नाही...)
#Kolhapur
आज कोल्हापूरात नेहमी डोळयांसमोर असणाऱ्या वास्तू इतक्या सवयीच्या झाल्यात, डोळ्यात बसून गेल्यात की त्यांचं ऐतिहासिक, सांस्कृतिक मोल आपण एकतर विसरून गेलोय किंवा माहीतच करून घेतलेलं नाही.
मुद्द्यावर येतो.
शहराचं वैभव आणि मानबिंदू असणारा जुन्या राजवाड्याचा नगारखाना (चुकीचा उल्लेख, भवानीमंडप) किती लोकांनी निरखून, खास वेळ काढून बघितला असेल. गरजच वाटली नसेल. पण ही गरज वाटली होती ब्रिटिशांना, ती पण दीडशे वर्षांपूर्वी..
शनिवार,३ एप्रिल १८५८, द इलस्ट्रॅटेड लंडन न्युज ( The Illustrated London News)
या, लंडनमध्ये प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकाचा अंक (जवळपास १६२ वर्षांपूर्वीचा) ,खाली image मध्ये देतोय. पहिल्या पानावर काय दिसतंय बघा..
![]() |
| आपलाचं नगारखाना !!! |
या दिवशीच्या अंकात आपल्या नगारखान्याबद्दल विशेष बातमी आलेली होती. माझं म्हणणं जास्त स्पष्ट व्हावं त्या नियतकालिकाचं पहिलं पान मुद्दाम खाली देतोय..
![]() |
| The Illustrated London News फ्रंट पेज |
या बातमीत काय काय लिहिलंय ?
यात त्याचं एक सुंदर चित्र engrave केलेलंआहे. पुढच्याच पानावर त्याचं वर्णन आणि कौतुकाचे चार शब्द आहेत.जाणकारांना लगेच समजेल की राजवाड्याच्या आतल्या बाजूकडून हे नगारखान्याच चित्र चितारलय.चौकोनी खिडक्या, त्यांची संख्या, महिरपीवरचं कोरीवकाम आणि इतर बारीकसारीक कलाकुसर अगदी प्रमाणात साधली आहे.खटकतं ते फक्त प्रवेशव्दार, जरा जास्तच अरुंद वाटतंय.
असो, बातमीत चिमासाहेब महाराजांच्या बंडासदर्भात उल्लेख आलाय आणि पुढं लिहिलंय हा gateway काळ्या marble मध्ये असून, आतून आणि बाहेरून अतिशय सुंदर आहे. पण याच्या तीन बाजूनी ज्या इमारती आहेत त्या याला शोभत नाहीत, पण त्यामुळेच याचं देखणेपण अजून खुलतं..
पुढे लिहितात, शहराच्या तटाबुरुजांवर चार ते बारा पौंडी तोफा तैनात आहेत पण त्याही दारुगोळा नसलेल्या. त्यामुळे शहरावर कबजा करायला काही विशेष श्रम पडले नाहीत.
अतिशय दाट गर्दीच आणि अस्वच्छ शहर असं कोल्हापूरचं वर्णन ते करतात.१८४८ साली सुरू झालेल्या शहर स्वच्छतेच्या कामकाजाबद्दल उल्लेख केलाय.( त्याचाच एक भाग म्हणून पुढच्या काळात तटबंदी पाडली).
![]() |
| नगारखान्यासंदर्भातली बातमी. |
आता आपल्याकडची माहिती...
हा नगारखाना १८३४ च्या ऑक्टोबरमध्ये बांधून पूर्ण झाला. त्यावेळचे छत्रपती, बुवासाहेब महाराज यांनी उत्तर हिंदुस्तानातून कसबी लोक आणून याचं बांधकाम केलं.
हा नगारखाना अतिशय घोटीव दगडाचा असावा अशी बुवासाहेब महाराजांची इच्छा होती.असा दगड शेवटी जोतिबाच्या डोंगरात मिळाला. हा दगड जोतीबावरून कोल्हापुरात आणणे म्हणजे कष्टाचं काम..शेवटी महाराज स्वत: पाच हजार लोक घेऊन जोतीबावर गायमुख जवळ छावणी करून राहिले. आणि शेवटी रेडे, बैलांच्या पाठीवरन केर्ली, आणि केर्लीतुन कासारी नदीतून प्रयाग, आंबेवाडी मार्गे पंचगंगेतून होड्यांमधून कोल्हापूरात ,असा या दगडांचा प्रवास झाला.
हा नगारखाना बांधण्यासाठी जो रॅम्प तयार केला होता त्याची सुरुवात त्यावेळच्या शनिवार वेशीतून व्हायची, म्हणजे आजच्या शिवाजी पुतळा चौकातून !!!
करवीर रियासत असं सांगते की भाद्रपद वद्य त्रयोदशीला हा नगारखाना लोकांसाठी खुला झाला.म्हणजे म्हाळाच्या महिन्यात !!!! म्हणजे एक तर उल्लेख तरी चुकीचा असावा किंवा कोल्हापूरकराचं पुरोगामीत्व अगदी तेंव्हापासूनचं असावं..😀😀😀😀
![]() |
| नगारखान्याचे इतर काही अपरिचित फोटो !!!! |

अशी ही नगारखान्याची चित्तरकथा.
कोल्हापूरकरांच्या कित्येक पिढया याच्या खालून आल्या गेल्या. कोल्हापूरकरांच्या वाहनांनी विशेषतः KMT ने याच्या भिंती धुराने काळवंडण्यात मोलाचा हातभार उचलला होता. आता कुठे हा परिसर थोडा मोकळा श्वास घेतोय असं वाटतंय, पण ते ही पुरेसं नाही. बघा काही अजून करता येईल का ?
(बुवासाहेब महाराज म्हणजे चिमासाहेब महाराजांचे वडील, जर चिमासाहेब महाराज कोण हे माहीत नसेल तर मात्र अवघड आहे. पन्हाळ्याला जाणाऱ्या एस टी बसेस दसरा चौकातून पुढे जाऊन टाऊन हॉल म्हणून ज्या स्टॉपला थांबतात ,त्या बागेवर एक नजर मारून यावी).
.
© भारत पांडुरंग महारुगडे
मु. पो. करवीरनगरी
९८२२४४९८५६
९८२२४४९८५६
bharat,maharugade@gmail.com
संदर्भ:
ज्यांना पाहिजेत त्यांनी सांगा, लगेच देतो..
(माहिती माझ्या नावासहित शेअर करण्यास् माझी हरकत नाही...)
#Kolhapur

नागारखान्याबरोबर आपलेही कवतुक 👌
ReplyDeleteखूप छान माहितीपूर्ण लेख. अप्रतिम....
ReplyDeleteएक चांगली माहिती...
ReplyDeleteखीपच छान माहिती,भरतजी.अशीच कोल्हापूरच्या सर्व वेशींबद्दल माहिती बद्दल माहितीपूर्ण ब्लाॅग लिहावा.
ReplyDelete