हरहुन्नरी कमानदार कोल्हापूर...
आता कोल्हापूर म्हणलं की माझ्या आठवणी पार तटबंदी पाडायच्याआधी पासुन आणि कमरेला तलवारी असायच्या तेंव्हा पासून सुरू होतात. या आठवणी मी, वेगवेगळी पुस्तकं, पेपरमध्ये आलेले लेख, थोरामोठयांचीं व्याख्यानं, झालंच तर कोल्हापुरातल्या पेठा आणि त्यात राहणारे पिकलेले कोल्हापूरकर यांच्याकडून मिळवलेल्या आणि जमेल तशी टिपणं काढून ठेवलेल्या. आज या आठवणींमध्ये उकरताना एक जुनं टिपण हाताला लागलं आणि आजचा विषय मिळाला कमानी...कोल्हापूरातल्या कमानी..
जरा नजरेला उत्सुकतेचा गॉगल घातला की नेहमीच्या गोष्टी पण वेगळ्या दिसायला लागतात आणि त्यात आवड मिसळली की मग आनंदाशिवाय दुसरं काही उरत नाही. असाच अनुभव कोल्हापूरातल्या कमानी बघताना मला येतो.
सुरुवातच करायची म्हटली तर जुन्या राजवाड्याच्या नगारखान्याची कमान..
जब तक सूरज चांद रहेगा स्टाईल मध्ये कायमच कोल्हापूरची शान म्हणून असणार यात काही शंका नाही. अगदी नाईलाज म्हणून महाद्वार त्या नंतर येतं. अगदी उन्नीस बीस चा फरक. कोल्हापूर आणि या दोन्ही कमानी म्हणजे शरीर आणि प्राण यांचं नातं. उत्तरेकडचा घाटी दरवाजा डोक्यावर घाट घेऊन अडीच तीनशे वर्ष तरी अंबाबाईच्या दिनक्रम जागता ठेवत आलाय. पूर्वेकडचा, सरलष्कर भवनजवळचा दरवाजा तसा कोल्हापूरकर कधी वापरत असतील या बद्दल शंकाच आहे. कारण परगावचे भाविक अगदी आज्ञाधारकपणे या कमानी खालूनच रांगेनं ,शिस्तीत देवळात येतात. किती कोल्हापूरकर या दरवाजातून रांगेने दर्शन घेत असतील हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. परगावच्या लोकांचा हा दरवाजा परगावच्याच म्हणजे तळेगावच्या दाभाड्यानी बांधलाय हाही एक योगायोग. तसंच पुढं जाऊन शेषशायीला डावीकडे ठेऊन अतिबलेश्वराजवळ गेलं की दक्षिण दरवाजाची कमान भेट घेते. बहुतेक देवळाच्या चार दरवाजांपैकी ही सगळ्यात अलीकडे बांधलेली असावी.निरखून बघितलं तर कमानीत एक किर्तीमुख दिसेल.
नगारखान्याची एक आणि देवळाच्या या चार कमानी सोडल्या तर अजून एक पाचवी कमान या परिसरात आहे. आहे, म्हणजे फक्त आता जुन्या फोटोंमध्ये आहे. जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या समोरच ,देवळाकडे जाताना ही कमान एकेकाळी होती. या कमानीतूनच बाहेर पडून देवळाकडे जाता यायचं. एकदम देखणी आणि सुरेख कोरीवकाम केलेली. चार पाच पिढ्या आधीच कोण असेल तर ते जास्त सांगू शकतील. रस्ता बनवायच्या नादात ही कमान उडवली.
![]() |
| या फोटोत मध्य भागी दिसत आहे ती कमान तोडून तिच्या जागेवर जुना राजवाडा पोलीस स्टेशन समोरून अंबाबाई मंदिराकडे रस्ता बनवला गेला. |
जुन्या राजवाड्याच्या परिसरातून बाहेर पडलो की बिंदू चौकात कायमची बंद केलेली आदीतवार वेशीची कमान अडगळीत उभी आहे. आणि तिला पर्याय म्हणून सबजेल समोरची, त्या मानाने नवी आणि नाजूक अशी वाहत्या रस्त्यावरची कमान आपल्याला नगारखन्याकडे घेऊन जाते.
![]() |
| आदितवार वेशीच्या बंद केलेल्या दरवाजाची कमान |
आता पुढची कमान म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृहासमोरची कमान. इथल्या दोन कमानींपैकी आपल्या कामाची आहे ती म्हणजे दोन हत्तींची शिल्पे आणि एक संगमरवरी शिलालेख असणारी उजवीकडची. ही कमान एकेकाळी शिवाजी पुतळ्याच्या परिसरात जेंव्हा फेरीस मार्केट होतं तिथली. आता मात्र जशीच्या तशी आणून केशवराव भोसले नाट्यगृहासमोर उभी केली आहे.
![]() |
| फेरीस मार्केटची कमान , मूळ स्थानी ... |
![]() | |
|
आता इथलीच दुसरी डावीकडची कमान म्हणजे एकेकाळी टाऊन हॉल समोर असणारी कमान. या कमानीचा मूळ फोटो आम्ही शोधत होतो पण मिळत नव्हता. आणि अचानक कदमबांडे सरकारांच्या मुळे बेबीराजेंच्या लग्नाच्या वेळी काढलेल्या फोटोत तो मिळाला. अंदाजे १९७० च्या भावसिंगजी रोडच्या रुंदीकरणात ती केशवराव भोसले नाट्यगृहासमोर विस्थापित करण्यात आली असावी.
थोडीशी दुर्लक्षित आणि अपरिचित म्हणता येईल अशी शुक्कूरवारातली जैन मठाची कमान. जवळ राहणारे लोक सोडून कोल्हापूरच्या उपनगरात राहण्याऱ्या लोकांना एकदम अपरिचित अशी. पण मुद्दाम जाऊन बघण्यासारखी.
पण सगळ्यांनाच असं भव्यतेचं भाग्य मिळत नाही. बाबूजमाल दर्ग्याच्या पूर्वेकडील गेरूने रंगवलेली कमान ही अशीचं एकदम साधी, भव्य नसणारी आणि दुर्लक्षितच.. त्या मानाने दसरा चौकातल्या कमानीच्या नशिबात दसऱ्याच्या दिवशी तरी चमकायचा योग दरवर्षी असतो. त्याच धर्तीवर उपेक्षेचं दुर्भाग्य पाण्याच्या खजिन्याच्या कमानींच्या वाट्याला पुरेपूर आलेलं आहे. जेंव्हा कोल्हापूरची तहान कळंबा परिसरातून पाणी पुरवून भागवली जायची तेंव्हाच्या या कमानी.. लफ्फेदार कमानींची रांग.. आज एखाद दुसरी तरी नजरेला पडली तरी भाग्य.. गुरू महाराज वाड्याची किंवा रंकोबाच्या देवळाच्या किंवा शिवाजी पेठेतल्या महाकालीच्या देवळाच्या कमानी आता इतक्या सवयीच्या झाल्यात की नजरेचा ठाव घेत नाहीत. ही यादी अजूनही वाढेल. या सगळ्या कमानीनी कोल्हापूर बदलताना बघितलंय. नव्या कोल्हापूरच्या इमारतींनी या जुन्या कोल्हापूरच्या काही पाऊलखुणा पार पुसून टाकल्यात , कुठंतरी एखादा ठसा शिल्लक आहे.
आता नंबर नव्या काळातल्या कमानींचा..
पण कुणाचा नंबर लावू ? कुणाचाच नंबर लागणार नाही. सगळ्या काठावर पास, कारण सिमेंट काँक्रीट मध्ये बनवलेल्या , 3D modelling चा आधार घेऊन design केलेल्या या कमानी जुन्या काळातल्या कुठल्याही कमानी समोर सौंदर्यदृष्ट्या टिकणार नाहीत. तावडे हॉटेल ची स्वागत कमान बघितल्यावर माझं म्हणणं पटेल. रंकाळ्याला ताराबाई रोडवर नवीन उभारलेली कमान, आजकाल फॅड निघालय त्या गल्ली आणि पेठांच्या स्वागत कमानी पण याच सदरातल्या. असो ,पण यामुळं नव्या कोल्हापूरकराचं हुनर कुठं दडत नाही. परवाच्या शिवजयंतीच्या उभा मारुती चौकातली महाराजांची कमान , बिनखांबी गणेश मंदिराजवळची फोम रेक्झिन पासून बनवलेली रायगडाच्या मनोऱ्यांची कमान एक से बढकर एक होत्या.
विषय लांबला, पण संपला नाही. आता थोडा twist घेतो आणि काही मुलखावेगळ्या कमानींबद्दल बोलतो... इतकं वाचलसा, आता कळ सोसून पुढचं पण वाचा, मग कोल्हापूर जगात भारी का ते कळेल..
कट टू ,२ एप्रिल १९४७...शहाजी महाराज दत्तक आल्यावर त्यांचा राज्यभिषेक सोहळा पार पडला. आणि त्यांची मिरवणूक कोल्हापूर शहरातून निघाली...मिरवणुकीचा मार्ग आहे भवानी मंडप, शिवाजी पुतळा, बिंदू चौक ( कदाचित one way नसेल तेंव्हा ), खासबाग, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, नगरपालिका आणि शेवटी भाऊसिंगजी रोड. साडेतीन तासाची मिरवणूक...
कोल्हापूरातल्या इलाखा पंचायतीने रस्त्यांवर मंडप घातलेले. देवल क्लब जवळ सर्वात उंच कमान दिमाखात उभारली होती. समाजातल्या सर्व घटकांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे, रुतब्याला साजेसं असं छत्रपतींच स्वागत केलेलं. हॉटेल मालक संघाने नगारखान्याला साखरेचं तोरण बांधलेलं. शुगर मिल तर्फे उसाची कमान तर शिरोलीतंच उभारलेली.
मिरवणूक महाद्वार रोडवर आली. कापड दुकानदारांनी भरजरी शाहू फेट्यांची कमान उभारलेली.
पापाच्या तिकटीला स्वागत केलं ते वीर हनुमान सायकल कंपनीच्या कमानीने..कमान कशाची ? तर सायकलींची कमान.
पुढे वायल्डर चर्च जवळ नगरपालिकेजवळ कमान होती ती वेगवेगळ्या फळांची, बागवान समाजाची..
पुढच्या चौकात एक वेगळीचं कमान होती.. बिड्यांची...बिडी कामगारांनी बनवलेली..
आणि कळस म्हणजे त्या पुढची कमान होती भांडी व्यापाऱ्यांची..चक्क तांब्याचे बंब वापरून उभी केलेली..
आज दुर्दैवाने या आगळ्या वेगळ्या कमानींचे कसलेही फोटो उपलब्ध नाहीत.
बघा, फक्त कमान या विषयावरच लिहायचं बोलायचं ठरवलं तर कोल्हापूरात इतकं ढीगभर सांगता येतं. अशा अनेक गोष्टी, प्रथा, आणि विशेष म्हणजे लोक कोल्हापूरात पिढ्यांपिढ्या आहेत जे कोल्हापुरला विशेष बनवतात..
कमान पुराण संपूर्णम।।।
-- भारत पांडुरंग महारुगडे
![]() |
| शुक्रवार पेठेतली लक्ष्मीसेन जैन मठाची कमान |

| पाण्याच्या खजिन्याच्या कमानीची रांग , कोल्हापूर १९६०, मागे जोतिबा डोंगर दिसतोय ... |

मु. पो. करवीरनगरी
९८२२४४९८५६
ता. क. : मला आठवतील तशा कमानी मी मांडल्या आहेत. जर नजरचुकीने मी एखादी कमान विसरलो असेल तर लक्षात आणून देणाऱ्याचे आधीच अभिनंदन करतो .. जागरूकपणे आजूबाजूला लक्ष ठेवत कोल्हापुरात फिरल्याबद्दल ....

Khup chan information.....!!!
ReplyDeleteधन्यवाद....
Deleteashich ek kaman amchya sarnaik wadyachi hoti.raste rundikarnat ti kadhavi lagli.atlya bajula tyachya varachi ganesh patti ahe.durdaivane aaj tya kamanicha photo nahi ahe konakadehi yache vait vatate.
DeleteGood... Mitra Bharich
ReplyDeleteअत्यंत सुंदर आम्ही कोल्हापूरात असूनही आम्हाला माहिती नाही
ReplyDeleteAwsome writeup Bharat ..
ReplyDeleteमस्तच भारतराव
ReplyDeleteज्ञानात भर घालणारी मौलिक माहिती.
ReplyDeleteजबरदस्त माहिती
ReplyDelete